Shivaji Shikshan Sanstha Election 2022 : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट लागलं आहे. आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला आहे. निवडणुकीवेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत मोठा राडा झाला आहे. मतदान केंद्रावर दोन गटात मोठा राडा झाला. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट लागलं. पोलिस - कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. आमदार देवेंद्र भुयार यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावरही मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू झाला आहे. 


आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की


शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि मोठा गोंधळ झाला. निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.


9 पदांसाठी 21 उमेदवार रिंगणात 


शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था आहे. शिवाजी शिक्षण संस्थेची आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत नऊ पदांसाठी 21 उमेदवार रिंगणात उभे आहेत. सकाळी 8 वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. या निवडणुकीत 774 सभासद मतदान करणार आहेत. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये काटे की टक्कर होणार आहे.


संध्याकाळी 7.30 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार


अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक विदर्भातील मोठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक सध्या सुरु असून मतदान केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवाजी शिक्षण संस्थेसाठी मतदान सुरु असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या