एक्स्प्लोर
Solapur Municipal result Live : सोलापुरात पहिल्यांदाच कमळ
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहास पहिल्यांदाच कमळ फुललं आहे. 1964 मध्ये महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजप सत्तेवर येण्याची चिन्हं आहेत. 102 पैकी 49 जागांवर विजय मिळवत भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सोलापूर महापालिकेत भाजपला 49 जागा मिळाल्या आहेत, म्हणजेच बहुमतापासून अवघ्या दोन जागा भाजप दूर आहे. शिवसेना 21 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेस 14 जागा मिळवत तिसऱ्या तर एमआयएम 9 जागा मिळवत चौथ्या स्थानावर आहे. राष्ट्रवादी आणि बसपला प्रत्येकी 4 जागा, तर माकपला 1 जागा मिळाली आहे. मनसेला मात्र सोलापूर महापालिकेत खातं उघडता आलं नाही.
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग आहे. एकूण 26 प्रभाग असल्यामुळे 102 सदस्य निवडून आले आहेत. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग)
पक्षीय बलाबल कसं ?
- भाजप 49,
- शिवसेना 21,
- काँग्रेस 14,
- राष्ट्रवादी 04,
- मनसे 00,
- MIM 09,
- बसप 04,
- माकप 01
- सोलापूर प्रभाग क्रमांक 13 मधून माजी आमदार नरसैय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम विजयी
- सोलापूर प्रभाग 7 मध्ये सेनेचे चारही उमेदवार विजयी, माजी महापौर (राष्ट्रवादी) मनोहर सपाटे, माजी उपमहापौर (राष्ट्रवादी) पद्माकर काळेंचा पराभव
- सोलापूर महानगरपालिकेत भाजप इतिहास घडवण्याच्या वाटेवर. 1964 च्या महानगरपालिका स्थापनेनंतर प्रथमच भाजप सत्तेवर येण्याची चिन्हे. एकहाती सत्ता स्थापन करण्याकडे भाजपची वाटचाल
- प्रभाग पाच ड मधून बसपचे आनंद चंदनशिवे विजयी
- प्रभाग सहा मधून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर विजयी
- विद्यमान महापौर सुशीला आबुटे यांचा पराभव, प्रभाग 24 मधून काँग्रेसच्या आबुटे पराभूत
- माजी महापौर आरिफ शेख पराभूत, भाजपच्या चिन्हावर प्रभाग 15 मधून उमेदवार
- पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख विजयी, प्रभाग क्रमांक 2 मध्ये विजयी
- सोलापूर प्रभाग 16 मधून माजी महापौर, काँग्रेस उमेदवार संजय हेमगड्डी यांचा पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement