एक्स्प्लोर

Solapur Maratha Aakrosh Morcha : कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा, नरेंद्र पाटील म्हणाले, पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढणार

Solapur Maratha Reservation Aakrosh Morcha : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले.

Solapur Maratha Reservation Aakrosh Morcha : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा निघाला.  नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती तर मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती.  मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. त्यानुसार आजचा मोर्चा निघाला.  

या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक   माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. 
 
पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल- नरेंद्र पाटील 
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या एकही तरुणावर गुन्हा दाखल करू नका.  गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा. ब्रिटिश काळात जसे पोलीस वागायचे तसे आता पोलिसांनी तसेच केले. आजचा मोर्चा यशस्वी झाला, अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिला.  आम्ही कुणालाही टार्गेट करत नाही, आम्ही कुणाला टोला लगावला नाही.  उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे यांना निमंत्रण दिलं होतं. काही कामानिमित्त आले नसतील, पण त्यांच्या शुभेच्छा आमच्या सोबत आहेत.  यापुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल, असंही ते म्हणाले. 

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. सोलापूर शहरात नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले होते. दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात आला होता. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.  तर शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात आले होते. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती.  

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Embed widget