एक्स्प्लोर

...त्याने हजारो बनावट जातीचे दाखले बनवले!, सोलापूरच्या शिवसिद्ध बुळ्ळाच्या धक्कादायक करामती

सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावात राहणाऱ्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप पाहून तुम्ही देखील डोक्याला हात मारुन घ्याल. सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने अवैध ठरवलेला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला याच महाशयाने तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शिवसद्ध बुळ्ळा याच्या घर झडतीत सापडलेल्या कागदपत्रातून नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरात आढळलेल्या एका कागदपत्राद्वारे 2015 च्या प्रकरणात देखील त्याला आरोपी करण्यात आले आहे. तर बुळ्ळाच्या घरात सापडलेल्या तीन दाखल्यांची नोंद ही तहसील कार्यालयाकडे नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याने असे किती दाखले तयार केलेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. 

सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावात राहणाऱ्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप पाहून तुम्ही देखील डोक्याला हात मारुन घ्याल. सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने अवैध ठरवलेला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला याच महाशयाने तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.  शिवसिद्ध बुळ्ळा हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून वैद्यकीय कारणामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  मात्र पोलिसांना चौकशीत बुळ्ळाच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे

त्याच्या सोलापुरातील दोन आणि अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील एका घरात शोध घेण्यात आला. यामध्ये पोलिसांना काही कागदपत्रे हाती लागली. याच कागदपत्रांचा तपास जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरातून नितीन साळुंखे नावाच्या व्यक्तीचा एक दाखला आढळून आला. 2015 साली सुमारे 200 बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी जात पडताळणी समितीने पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या दाखल्यांपैकी एक दाखला म्हणजे नितीन साळुंखे यांचा दाखला होता.

जात पडताळणी समिती कार्यालयात काम करणाऱ्या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेली एक महिला शिवसिद्ध बुळ्ळा याच्या मालकिच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती असं पोलिस तपासात समोर आलं. त्यामुळे 2015 च्या या प्रकऱणात देखील शिवसिद्ध बुळ्ळा याला आता आरोपी करण्यात आलं आहे. बुळ्ळा याची रुग्णालयातून मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणात पोलिस त्याच्या कोठडीची मागणी न्यायलयाकडे करु शकतात.

या सोबतच शिवसिद्ध बुळ्ळा याची मुलगी, भावजय आणि गावातील एका व्यक्तीचे जातीचे दाखले देखील घर झडतीत सोलापुरच्या गुन्हे शाखेला मिळाले होते. मात्र जेव्हा गुन्हे शाखेने अक्कलकोट तहसीलदारांना या दाखल्याबाबत माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडे देखील या दाखल्यांसंदर्भात कोणतीच नोंद नसल्याचं देखील उघड झालंय.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला हरवल्याची तक्रार याच शिवसिद्ध बुळ्ळा यांने वळसंग पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांना दिलेल्या अर्जात आणि खासदारांच्या दाखल्यावरील अक्षरात साम्य आढळल्याच्या संशयातून पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र अटकेवेळी त्याच्या घरातून अक्कलकोटच्या तहसीलदारांचे शिक्के देखील आढळून आल्याचं पोलिस सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे शिवसिद्ध बु्ळ्ळा यांने या शिक्क्यांचा वापर करुन किती बनावट दाखले तयार केले असतील याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे.

अक्कलकोट तालुक्यात बोगस दाखले सादर करुन विविध योजनांचे अनुदान लाटल्याचा आरोप या पूर्वी देखील करण्यात आला आहे. 2012-13 आणि 2015-16 या वर्षात शासनाच्या अनेक योजना बनावट कागदपत्र सादर करुन लाटल्याचं सिद्ध झालं होतं. या प्रकरणात 2017 साली पुणे विभागाचे तत्कालीन उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कोणतेही गुन्हे या प्रकरणात दाखल झालेले नाहीत असा आरोप हालहळ्ळी (मै) गावचे माजी सरपंच विश्वनाथ विठ्ठल इटेनवरु यांनी केलाय.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने दिला. मात्र त्याबाबत आता उच्च न्यायलयात सुनावणी सुरु आहे. मात्र या प्रकरणात आरोपी असलेल्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरझडतीत आढळलेल्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सोलापूर गुन्हे शाखा तपास करत आहे. त्यांना केवळ याच प्रमाणपत्राबाबत तपास करण्यासाठी मर्यादा आहेत. मात्र शिवसिद्ध बुळ्ळा याने नेमकं किती लोकांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. आणि त्या कागदपत्रांचा वापर करुन कोण कोण शासकीय सेवेत, राजकारणात किंवा आणखी कुठे आहे याच तपास करण्याची गरज आता निर्माण झालीय. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget