एक्स्प्लोर
दारुड्या मुलाकडून आई, बायको आणि मुलाची हत्या
सोलापूर: दारुड्या मुलाने स्वत:ची आई, बायको आणि मुलाची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आई आणि मुलाला ठेचून मारलं, तर बायकोला पेटवून दिलं. याशिवाय मुलीवरही हल्ला करुन तिला गंभीर जखमी केलं.
अनुरथ बरडे असं 45 वर्षीय आरोपीचं नाव आहे. बार्शी तालुक्यातील कोरफळे इथं ही धक्कादायक घटना घडली.
यामध्ये सखुबाई बरडे, रेश्मा बरडे आणि सुदर्शन बरडे यांचा मृत्यू झाला आहे. तर अंगावर अनेक वार असलेल्या मुलीवर उपचार सुरु आहेत. जखमी मुलगी इयत्ता पाचवीत शिकते.
आज पहाटे घडलेल्या या थराराने परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.
अहमदनगरमध्ये हत्याकांड
दोनच दिवसांपूर्वी अहमदनगरमध्येही अशाचप्रकारचं हत्याकांड झालं होतं. राहाता तालुक्यातील लोणीत पत्नी, दोन मुली आणि एका मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. देवीचंद ब्राम्हणे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे हत्या केल्याचा संशय वर्तवला जातो आहे.
संबंधित बातम्या
अहमदनगरमध्ये पत्नीसह तीन मुलांची हत्या
गोंदियात 500 रुपयांसाठी 70 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement