एक्स्प्लोर

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय... फक्त 90.. कदमांच्या आज्जानं गेल्या 84 वर्षांपासून चाकं पाहिलीच नाहीत.

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय... फक्त 90.. कदमांच्या आज्जानं गेल्या 84 वर्षांपासून चाकं पाहिलीच नाहीत.. त्याला पेट्रोलच्या दरवाढीनं काही फरकही पडत नाही.. कारण घोड्याचे चार पाय... हीच त्याची चाकं आहेत..आणि त्याचा चारा हेच त्याचं इंधन. अर्जुन कदम हे सोलापूर जिल्ह्यातील जेऊर गावानजीक झरे या गावचे रहिवाशी. वयाची नव्वदवी गाठलीय, पण आजही ते त्यांच्या घोड्यावरुनच प्रवास करतात. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आजही शेतात काम करतात. शेळ्यांना, गाईला चारा आणणे, अशी अनेक कामं ते रोज करतात. इतकंच नाही तर शेतातील पालेभाज्या घोड्यावरुन जाऊन बाजारात स्वतः विक्री करतात. अर्जुन कदम यांच्या घरी वडिलोपार्जित घोडे होते, वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी घोड्याची सवारी सुरु केली, ती आजपर्यंत सुरुच आहे. पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नसल्याने लोक घोड्यावरुन प्रवास करीत असत. काळ बदलत गेला तसे अनेकांकडे सायकल, दुचाकी, चारचाकी आल्या, पण अर्जुन आजाचा प्रवास घोडयावरुनच सुरु आहे. आपल्या कामासाठी, नातेवाईकांच्या गावी, लग्नकार्य काहीही असो, अर्जुन आजा नेहमीच घोड्यावर सवारी करतात. अर्जुनआजाकडं सध्या घोडी आहे. बुगडी तिचं नाव... आजाच्या लाडाची... आजा तिच्यावर स्वार झाला... की या थरथरत्या शरिरालाही वेग येतो.. आजा वाऱ्याशी स्पर्धा करतो... बाजारातली खरेदी असो.. किंवा कुठला दौरा... आजाची स्वारी घोड्यावरीच. दररोज 25 ते 30 किलोमीटरची रपेट ठरलेलीच. 84 वर्षे झाली.. आज्जा या सवारीशिवाय जगूच शकत नाही. बायको, दोन मुलं, नातवंडं.. असा गोतावळा... शेतात आजही आजाचा हात सफाईदारपणे चालतो... काळाप्रमाणे माणसानं बदलायला हवं, असं म्हणतात... पण अर्जुन कदमांसारखी असतात काही अवली माणसं... जी फक्त आपल्या तत्वांवर जगतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget