Solapur Accident : सोलापूर- मंगळवेढ्यात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
Solapur Accident : मंगळवेढा - सोलापूर मार्गावर कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर : सोलापूरातील मंगळवेढ्यात टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवेढा - सोलापूर मार्गावर बेगमपूरजवळ हा अपघात झाला.
मंगळवेढा - सोलापूर मार्गावर कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात अजून एक गंभीर जखमी असून इतर तीन किरकोळ जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास दामाजी कारखान्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातास जबाबदार असणाऱ्या टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या अपघातात मृत्यू झालेले जत तालुक्यातील उमदी या गावाचे असून ते औरंगाबाद येथून उमदीकडे निघाले असताना बेगमपूर जवळ हा भीषण अपघात झाला. टेम्पोच्या धडकेने कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी सोलापुरात पाठवले. सर्व अपघात झालेल्या व्यक्ती हे उमदी , तालुका जत येथील असून उमदी गावातील सहा जण इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते. हा कार्यक्रम संपवून रात्री उमदी गावाकडे परत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये जैनुद्दिन काशीम यादगिरे वय 40, (रा. उमदी) आणि मौलाना साजिद खान वय 45 (भिवंडी, मुंबई) सध्या रा. उमदी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर प्रवीण हिरेमठ यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे .या भीषण अपघात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे .
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या:
शरद पवारांप्रमाणे अपग्रेड राहा, अजित पवारांचा शिक्षकांना सल्ला
- Coronavirus in India : देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 7 हजार प्रकरणे, 387 जणांचा मृत्यू
- आरबीआयने या बँकेला ठोठावला 30 लाखांचा दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांनाही दणका
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या






















