एक्स्प्लोर

बाईकस्वाराला चुकवताना एसटी झाडाला धडकली, 4 मृत्यूमुखी

सोलापूर : साताराहून करमाळ्याकडे जाणाऱ्या एसटीला अकलूजजवळील वठफळी इथे भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत.   करमाळा डेपोची एसटी साताराहून करमाळाकडे जात होती़. मात्र वटफळीजवळ बाईकस्वाराला चुकवताना एसटी बस झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.   या घटनेत बाईकस्वारासह चार जणांनी जागीच प्राण सोडले. एकूण 22 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 8 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.   या भीषण अपघातात बस चालक अंकुश आणि कन्डक्टर पाटील सुदैवाने बचावले. अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने अपघातातील रुग्णालयात दाखल केलं.   मृतांची नावं दया वामन (वय 32 वर्ष, रा माळशिरस, बाईकस्वार), किसन सिद्राम पिसे (वय 70 वर्ष, रा. माळेवाडी, एसटी प्रवासी), अजय स्वामी (वय 50 वर्ष, रा. अकलूज, एसटी प्रवासी), एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.   जखमींची नावं रामचंद्र दामु गोडसे (वय 67 वर्ष), अमोल हनुमंत रणवरे (वय 26 वर्ष),  उदय कुलकर्णी,  एकता इंगोले (वय 42 वर्ष), एका महिलेची ओळख पटलेली नाही, यांच्यावर अकलूजमधील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.   शकुंतला सुरेश घाडगे (वय 65 वर्ष),  निलाबाई विठ्ठल पराडे (वय 35 वर्ष),  भगवान सखाराम देशमुख (वय 85 वर्ष), यांना अकलूजच्या गुळवे हॉस्पिटल उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.   अतुल जालिंदर राऊत (वय 25 वर्ष), अण्णा सोनबा कांबळे (वय 65), शरद चिंतामणी कुणेकर (वय 38 वर्ष),  लक्ष्मण बापुराव धाईंजे (वय 66 वर्ष), यांच्यावर अकलूज क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहे.   संदीप पोपट कांबळे (वय 35 वर्ष,  वसंत परशुराम कोळी (वय 50 वर्ष),  उमाकांत चंद्रकांत कुंभार (वय 40 वर्ष) यांना उपचारासाठी अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget