(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 11 जानेवारी 2021 सोमवार | एबीपा माझा
देशातील कोरोना लसीकरणाचा आढावा ते महापालका निवडणुकांपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
1. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, प्रशासन सतर्क; परभणीच्या मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच
2. कोरोनाच्या लसीकरणापूर्वी आज पंतप्रधान सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार
3. कोरोना लसीकरणाची सुरुवात होण्यापूर्वी कोविन व्यवस्थापनासाठी केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना, लसीकरण प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न
4. कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्र्यांची ग्वाही, केंद्राकडून लसी उपलब्ध होताच राज्यात लसीकरणाला सुरुवात,
5. शेतकऱ्यांच्या सर्व याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 46 दिवसांच्या आंदोलनानंतरही शेतकऱ्यांच्या याचिका अद्यापही अनुत्तरितच
6. वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश, 55 लाख रुपयांच्या व्यवहार प्रकरणी नोटीस
7. सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांहून जास्त
8. राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढणार तर देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, यांच्यासह इतरही भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात,
9. नवी मुंबई महापालिकेत मनसे स्वबळावर लढणार निवडणूक, आमदार राजू पाटील यांचे संकेत मनसैनिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता,
10. लाहोरमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या कारला अपघात, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक, मलिक थोडक्यात बचावला