एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 16 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावणार,मराठवाड्यातील सहा जागांसह राज्यातल्या दहा मतदारसंघांमध्ये मतदान
- निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून मोठं घबाड जप्त,आचारसंहिता लागू झाल्यानंतर 112 कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात
- माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार हातात घेतला तरी चिंता नाही,जालन्यात शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, तर सोलापुरात पवार आणि राज ठाकरे यांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम
- 'मी लाभार्थी'जाहिरातीतील तरुणाला मंचावर बोलवत राज ठाकरेंकडून सरकारची पोलखोल,जातीयवादाचं विष पेरण्यासाठी आरक्षणाचा घाट घातल्याचाही आरोप
- उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीत मोदींच्या नावाच्या घोषणा,भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचा आरोप, मात्र पोलिसांकडून आरोपांचं खंडन
- आझम खान,योगी आदित्यनाथ, मायावती, मेनका गांधी यांना निवडणूक आयोगाचा दणका, बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक प्रचारावर काही तासांची बंदी
- सुप्रीम कोर्टानेही'चौकीदार चौर है' मान्य केल्याचा दावा करणारे राहुल गांधी अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस, 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश
- बळीराजासाठी गूड न्यूज,सरासरीच्या 96 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, निवडणुकीच्या तोंडावरील भाकीतामुळे नेत्यांचेही डोळे आभाळाकडे
- हार्दिक पंड्याची तुफानी खेळी,आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची बंगळुरुवर पाच विकेट्स राखून मात
- आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा,दिनेश कार्तिक, केएल राहुल, विजय शंकर यांना संधी, तर रिषभ पंत आणि रायुडूला वगळलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement