(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | शुक्रवार | 15 जानेवारी 2021 | एबीपी माझा
राज्य, देशविदेश आणि इतरही क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, चांद्यापासून बांद्यापर्यंत गावागावांत राजकीय वर्चस्वासाठी चुरस
2. बलात्कारच्या आरोपांप्रकरणी धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, तूर्तास राजीनामा नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
3. मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा रिलेशनशिपसाठी दबाव, भाजप नेते कृष्णा हेगडेंचा दावा, तर मनसे नेते मनिष धुरी यांचाही रेणू शर्मावर ब्लॅकमेलिंगचा आरोप
4. भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स, चौकशीसाठी खडसे हजर राहणार का याकडे साऱ्यांच लक्ष
5. मुंबई महापालिकेकडून कोरोना लसींचं वितरण, लसीकरणापूर्वी मुंबईत पुन्हा ड्राय रन होणार, सहा रुग्णालयांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम
6. यंदाच्या वर्षासाठी अभ्यासक्रमात 50 टक्के कपात करा, मुंबईतील मुख्याध्यापकांसह इतर शिक्षक संघटनांची मागणी
7. कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्याचा पुरस्कार नाकारला, साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा
8. कोविड प्रभावित अर्थसंकल्पासाठी देश आणि विरोधकही सज्ज, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांच्या हाती स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नापासून शेतकरी आंदोलनाचे मुद्दे
9. ठाकरे सरकारच्या कारभारावर महाराष्ट्र किती समाधानी, मोदींच्या कामगिरीला जनतेकडून किती मार्क, देशाचा मूड काय, आज संध्याकाळी 7 वाजता माझावर
10. ब्रिस्बेन कसोटीत लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 65 धावा, निर्णायक कसोटीत भारतीय संघात नवोदितांची वर्णी