एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 9 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- लातूरच्या औसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर,तब्बल अडीच वर्षांनी एकाच व्यासपीठावर,उद्धव यांची राजनाथ सिंहांशी फोनवरही चर्चा
- भाजपमधील दुर्लक्षित ज्येष्ठांची पक्षाध्यक्षांकडून मनधरणी,लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशींची अमित शाहांकडून भेट
- पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार,गुरुवारी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान,तर चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
- भाजपचा पुन्हा राम मंदिराचा नारा,साठीनंतर शेतकरी-दुकानदारांना पेन्शन,तर बळीराजाला सरसकट 6 हजाराचं अनुदान, लोकसभेसाठी भाजपचं 75 कलमी संकल्पपत्र
- राष्ट्रवादीने जातीयवादाचं विष पेरलं, 'माझा'ला दिलेल्या सनसनाटी मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा घणाघात,मनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाल्याचीही टीका
- बारामतीतून सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित,मताधिक्याबाबत उत्सुकता,सांगलीतील सभेत चंद्रकांत पाटलांचा दावा, पवारांवरही टीकास्त्र
- कोल्हापुरात माजी उपमहापौराच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा,जमावाचा पोलिसांवरच हल्ला,महिला आयपीएसवर पिस्तुल रोखली
- देशभरातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर,तर मुंबई विद्यापीठ 81 व्या स्थानी,मानव संसाधन विकास मंत्रालयाची क्रमवारी
- विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडतानाचा क्षण रडारमध्ये रेकॉर्ड,पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय वायुसेनेची सणसणीत चपराक
- महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईला प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सर्वात मोठी बोली,कोल्हापूरच्या शिलेदाराला तेलगू टायटन्सकडून एक कोटी 45 लाखांची किंमत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement