एक्स्प्लोर
छोट्या दुकानदारांना पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्यास मुभा
किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार आहे. ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा देण्यात आला आहे.

मुंबई : अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना घेतला आहे. किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार आहे. ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा देण्यात आला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकेजिंगवरची बंदी उठवण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली. ग्राहकांना प्लास्टिक पिशवी वापरण्यासाठी बंदी आहे. मात्र किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी हा निर्णय असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. दरम्यान, अटी-शर्तींसह बंदी उठवण्यात येणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. काय आहेत अटी? किरकोळ दुकानदारांनी आणि उत्पादकांनी उत्पादीत प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी पॅकेजिंगवर उत्पादकाचं नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स उभारावेत संबंधित बातम्या :
प्लास्टिकबंदी : सर्व माहिती एका क्लिकवर
इडली-सांबार पार्सलसाठी अंबानींच्या घरातूनही स्टीलचे डबे
महाराष्ट्रात आजपासून ‘प्लास्टिकबंदी’
Before You Go
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion





















