एक्स्प्लोर
कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार, स्कोडा जळून खाक
कोल्हापूर : कोल्हापुरात आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. भर रस्त्यात स्कोडा कार जळून खाक झाली. पन्हाळा तालुक्यातील कोलोली खिंड परिसरात आज सकाळी 7 वाजता ही घटना घडली.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. सुदैवाने या घटनेत गाडीतील तिघे जण बचावले.
ननुंद्रे गावातील कृष्णा इंगळे कुटुंबीयांसह स्कोडा गाडीतून देवदर्शनासाठी निघाले होते. पण गाडी कोलोली खिंड परिसरात येताच शॉर्ट सर्किट झाल्याचं इंगळे यांच्या लक्षात आलं.
त्यानंतर कृष्णा इंगळेंनी गाडी कडेला लावली आणि कुटुंबीयांना बाहेर काढलं. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या घटनेत गाडीचा अक्षरश: कोळसा झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement