एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात बर्निंग कारचा थरार, ट्रायल रनवेळी स्कोडा कार जळून खाक
नागपूर : नागपुरात सदर परिसरात आज संध्याकाळी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे. पूनम चेम्बर्सजवळ एक स्कोडा कार जळून खाक झाली. कारने भररस्त्यात पेट घेतल्याने काही वेळ परीसरात धावपळ उडाली होती. संध्याकाळी 4 ते 4:30 दरम्यान ही घटना घडली आहे.
नागपूरमध्ये अकरम नावाच्या कार चालकाने पूनम चेम्बरजवळच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ही कार आणली होती. मेकॅनिक ट्रायल रन घेत असताना गॅरेज जवळच बोनेटमधून धूर निघू लागला. काही क्षणातच कारने पेट घेतला.
कारला आग लागताच तातडीनं अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली, पण तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान मेकॅनिक वेळीच कारमधून खाली उतरल्यानं बचावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement