आनंद शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. तर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. इंदापूरमध्ये डॉ अविनाश पाणबुडे यांच्या खासगी दवाखान्यात उपचार करुन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान अपघाताच्या वेळी आनंद शिंदे यांच्यासोबत गाडीत आणखी चार जण असल्याचं कळतं.