सिंधुदुर्ग : कुडाळ शहरात पेट्रोल पंपावरच्या शाब्दिक बाचाबाचीवरुन आता सेना भाजपकडून सोशल मीडियावर एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय. या प्रकरणावरुन आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे व त्याचे मोठे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी खुल्या मैदानात यावं असं आव्हान केलं तर राणेंचे खंदे समर्थक व भाजप कार्यकर्ते कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी आधी आमच्याशी मुकाबला करा असं आव्हान केलं. त्यामुळे येत्या काळात सोशल मीडियावर तरी सेना भाजपचं हे सोशल वाँर पहायला मिळणार.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहराच्या मध्यवर्ती आलेल्या भारत पेट्रोल पंपावर 100 रुपयांत प्रति वाहन दोन लिटर पेट्रोल तर भाजप सदस्य असलेले ओळखपत्र दाखवणाऱ्याला 1 लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केलं. त्यानंतर काल 11 च्या सुमारास आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपवर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वातावरण तंग झालं. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं.
याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ पोलीस स्थानकात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 141, 143, 149, 188, 269 आणि कलम 270 या अन्वये शिवसेनेचे आमदार वैभव नाईकसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आमदार वैभव नाईक यांची फेसबुक पोस्ट
भाजप समर्थकांचे प्रत्युत्तर
महत्वाच्या बातम्या :
- अष्टकोनी आकार अन् बारा दरवाजे... अमरावतीच्या पवनी गावातील मुघलकालीन ऐतिहासिक विहिर
- "राजगडावर रोपवे बांधू नका", पुण्यातील चिमुकल्या गडप्रेमी-ट्रेकरचं आदित्य ठाकरेंना लिहिलेलं पत्र व्हायरल
- BMC : ऑक्सिजन निर्मिती यंत्रांचे कार्यान्वितीकरणासाठी पालिका मोजतेय अतिरिक्त 30 कोटी रुपये, माहितीच्या अधिकारातून उघड