अमरावती : आपण अनेक सुंदर अशा पुरातन विहिरी बघितल्या असतील. काही भागात या विहिरीला "बावडी" असं देखील म्हणतात. राज्यात अनेक ठिकाणी पुरातन बावड्या आहेत. आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या विहिरी पाहिल्या असतील. पण अमरावती जिल्ह्यात विहिरीत एक घर असल्याचं पाहायला मिळालं आहे. तेही पुरातन काळातील घर. विशेष म्हणजे या विहिरीत एक मंदिर देखील आहे.


अमरावतीच्या पवनी गावातील श्याम घारड आणि मोहन घराड यांच्या शेतात दीडशे वर्षांपूर्वी पुरातन विहिर आहे. त्याच विहिरीमध्ये पुरातन काळातील एक घर आणि मंदिर असल्याचं समोर आलं आहे.


पवनी गावाच्या या विहिरीच्या आजूबाजूला दगडांमध्ये पुरातन मूर्तिकला पाहायला मिळतात. या विहिरीच्या आत बारा दरवाजे आहेत. म्हणून या विहिरीला "बारा द्वारी" विहिर असं म्हटलं जातं. ही विहिर अष्टकोनी असून या विहिरीचं बांधकाम मोगल काळातील आहे. या विहिरीचं संपूर्ण बांधकाम हे विटांनी केलेलं आहे.


या विहिरीत साप असल्याचं गावकरी सांगतात त्यामुळे या विहिरीत आजपर्यंत कोणीही उतरलं नाही. विशेष म्हणजे आम्ही जेव्हा या विहिरीत धाडस दाखवत आत उतरलो तेव्हा या विहिरीच्या बारा दरवाज्याच्या व्यतिरिक्त अजून खाली बारा दरवाजे असू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे या बंद असलेल्या बारा दरवाजाच्या आत काय असू शकते याचा संशोधकांनी शोध घेण्याची गरज आहे. ही विहिर श्याम आणि मोहन घराड यांच्या आजोबांच्या आजोबांनी बनवून घेतली आहे. त्याकाळात त्यांनी विहिरीच्या बाजूला एक घर वरती पण बनविले होते. कालांतराने वरती असलेलं घर नामशेष झालं आहे. पण विहिरीत असलेलं घर आणि मंदिर जसाच तस पाहायला मिळते.


इतिहासक आणि संशोधकांच्या मते ही विहिर मोगल काळातील असू शकते. 17च्या दशकात या विहिरचं आणि त्याचं बांधकाम झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मंदिरात कदाचीत मुर्त्या असाव्या पण आता त्या नामशेष झाल्या असाव्यात. या विहिर आणि विहिरीतील घराचं संशोधन करून अधिकची माहिती समोर यावी आणि इथं पर्यटक स्थळ बनावं अशी मागणी आता होत आहे.


ही विहिर माझ्या आजोबाच्या आजोबांनी बांधली : मोहन घराड


ही पुरातन विहिर आमच्या आजोबाच्या आजोबांनी बांधली आहे, या विहिरीला ‘12 द्वारी’ म्हणतात कारण याला 12 दरवाजे आहेत. अदयापही या विहिरीची काम मजबूत आहे. या विहिरीत आतजायला बाजूला पायऱ्या आहेत.. आत मध्ये मंदिर पण आहे आणि त्याठिकाणी 10 बारा खिडक्या आहे. तर तेथे मुर्त्या देखील असण्याची शक्यता आहे. पण आम्हाला त्या पाहायला मिळालं नाही. विहिरीच्या मालकाची या परीसरात 400 ते 500 एकर जमीन होती आणि ते दोन तीन गावचे मालगुजार होते. विशेष म्हणजे विहिरीच्या बाजूलाच त्यांचं महल पण होतं. पूर्वी गावातील लोकं या विहिरीतूनच पाणी भरत होते अशी माहिती विहिरीचे मालक मोहन घराड यांनी दिली.


ही विहिर मोगल काळातील असावी


या विहिरीचे बांधकाम मोगल काळात करण्यात आले असावे. कारण त्या काळात या परिसरात अशा विहिरी बांधल्या गेल्या आहेत. ही विहिरी स्थानिक सरकार किवा मनसबदार यांनी ही बांधली असावी. त्या विहिरिच बांधकाम विटांनी बनविले असून आत घरासारखं आणि मंदिरासारख बांधकाम आहे. पण मंदिरात मूर्त्याच नासधूस झाली असावी असा अंदाज आहे. विहिरीच्या दगडावर दत्तात्रय आणि प्रभू राम-सीता, लक्ष्मण यांचे शिल्प कोरले आहे. त्यामुळे या शिल्पाच्या निदर्शनातुन असं लक्षात येते की या विहिरीचं काम 17 किंवा 18व्या शतकातील असाव. या विहिरीची दुरवस्था झाली असून या सगळ्याच संवर्धन करण्याची गरज असल्याचं मत इतिहास जाणकार तथा पत्रकार विवेक चांदूरकर यांनी व्यक्त केलं.