एक्स्प्लोर

रत्नागिरी-सिंधुदुर्गाला जोडणारा 'दांडी' पूल खचला, वाहतूक बंद

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील दांडी पूल खचला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक रत्नागिरीच्या बांधकाम विभागाने बंद केली आहे. गेल्या वर्षी सावित्री पुलाच्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागरी महामार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रायगडपासून सिंधुदर्गापर्यंत समुद्राला समांतर जाणाऱ्या सागरी महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून उभारणी केली जाते आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अनेक पुलांची उभारणी यापूर्वीच झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावर अनेक मोठे पूल उभारले गेले आहेत. यातील अनेक पूल गेल्या काही वर्षात विविध तांत्रिक कारणांनी चर्चेत असतानाच आता दांडी पुलाचा भाग खचू लागल्याने बांधकाम विभाग अडचणीत आलं आहे. दांडी पुलाची उभारणी करून काही वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण उद्घाटनाशिवाय सागरी महामार्गावरील अन्य पुलांप्रमाणेच हा पूलही रहदारीसाठी  खुला केला गेला. मात्र, या पुलाच्या रत्नागिरीच्या अणसुरे गावाकडील बाजू गेल्या काही वर्षांपासून खचू लागली होती. रत्नागिरी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुलाचा खचणारा भाग सावरण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी बांधकाम विभागाकडून करण्यात आला. काही लाख रुपये यावर खर्च करण्यात आले. पण यात यश आले नाही. दांडी पुलाचा बॉक्स रिटर्न खचल्याने बँक्स सेलवरील दबाव वाढला आणि यामुळेच राफ्ट, व्हर्टिकल वॉल आणि कट ऑफ वॉल यामध्ये भेगा पडू लागल्या आहेत. या भेगा गेल्या काही दिवसात अधिकच रुंदावू लागल्याने अखेर मुख्य अभियंत्यांनी या पुलाची पाहणी  करत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबतचा पत्र व्यवहार रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी केला. अखेर कालपासून दांडी पुलाची वाहतूक अवजड आणि मोठ्या वाहनाकरिता पूर्णतः बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक बंद झाल्याने या मार्गावरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून मालवण-वेंगुर्ला या भागात जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा जवळचा मार्ग होता. सागरी महामार्गावरील हा पूल बंद झाला असला तरी रत्नागिरीतून राजापूरच्या डोंगर मार्गे या पुलाला पर्यायी मार्ग आहे. मात्र या मार्गावरुन प्रवाशांना जवळजवळ 26 ते 28 किलोमीटरचा अधिकचा प्रवास करावा लागत आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या काळात हा मार्ग पूर्णतः बंद राहील. पावसाळ्यानंतर या पुलाची डागडुजी करुन हा मार्ग पूर्ववत करण्यात येईल, असं बांधकाम विभागाने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Jaykumar Gore: संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Police Written on Vehical : खासगी वाहनांवर पोलीस लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget