Rain News : राज्याच्या विविध भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळं मच्छीमारांनी नौका पुढील दोन दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आव्हान देखील करण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती
कोकण किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवसात या कालावधीत 35 ते 55 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या अनुषगाने खाडी क्षेत्रात किंवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळी वाऱ्यासह पावसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्हातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत. याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. अशा सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यभरात पावसाचा चांगलाच धुमाकूळ
राज्यभरात पावसाचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे .राज्यात पूर्व मान्सून ने थैमान घातल्या असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालीय. सकल भागात पाणीच पाणी साठले असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे . कोकण रेल्वेच्या अडवली भागात काल पावसामुळे दरड कोसळल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू केले होते. आजही कोकण विभागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झालाय . तळ कोकणात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या 24 तासात सरासरी 96.5 मी मी पावसाची नोंद झाली आहे .आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा सांगलीसह राज्याच्या अनेक भागात आज तुफान पाऊस आहे .पावसामुळे पुण्यातील पद्मावती परिसरातील संरक्षण भिंत कोसळली आहे . तळकोकणात साधारणपणे सकाळी 11 नंतर गोव्याला हा पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण गोव्याला या पावसाला अक्षरशः झोडपून काढलं.
महत्वाच्या बातम्या: