Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निष्पाप पर्यटकांवरील सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झाला. 22 एप्रिल 2025रोजी, चार दहशतवादी जंगलातून पहलगामच्या बैसरन खोऱ्यात आले. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी एकूण 26 जणांना ठार मारले आणि पुन्हा जंगलात गायब झाले. या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेला आता एक महिना झाला आहे, सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु त्या चार क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेल नाही. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली, अजून राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या दहशतवाद्यांची माहिती मिळालेली नाही.

Continues below advertisement


आतापर्यंत 3 हजार जणांची चौकशी


आतापर्यंतच्या तपासात फक्त तीन नावे आढळली असून त्यामध्ये आदिल, मुसा आणि अली यांचा समावेश आहे. तिघांवर प्रत्येकी 20 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते, 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली, 113जणांना अटक करण्यात आली, परंतु आदिल, मुसा आणि अलीचा शोध लागला नाही. त्यांचे ठिकाणही सापडले नाही. 


आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत 


हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआयएने 27 एप्रिलपासून अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला.  एनआयए प्रमुख सदानंद दाते या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. एजन्सीचे आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे तीन अधिकारी तपासात गुंतले आहेत. एनआयएची एक टीम अजूनही पहलगाम आणि आसपासच्या भागात सतत तपास करत आहे. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यापैकी अनेक लोकांना दररोज पहलगाम पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बोलावले जात आहे.


7 मे रोजी एनआयएने एक संदेश जारी करून लोकांना आवाहन केले की ते पहलगाम हल्ल्याशी संबंधित नवीन फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही माहिती देऊ शकतात. यासाठी हेल्पलाइन नंबर देखील जारी करण्यात आले होते. तथापि, एनआयएने अनंतनाग पोलिसांनी जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी संबंधित कोणतीही माहिती मागितली नाही. तसेच त्यांची नावे किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही वेगळी माहिती मागितली नाही.


दहशतवाद्यांचा जंगलात अड्डा असण्याची शक्यता


दरम्यान, आतापर्यतच्या चौकशीनुसारस फरार चार दहशतवादी फक्त दोन किंवा तीन स्थानिकांच्या संपर्कात असून तेच त्यांना आवश्यक वस्तू पोहोचवत आहेत. यामुळे दहशतवाद्यांना शोधणे कठीण होत आहे. दहशतवादी जंगलात, गुहेत किंवा डोंगराळ भागात बांधलेल्या लपण्याच्या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता आहे. 


महिन्यातून दोनदा बक्षीस जाहीर, दहशतवाद्यांचे पोस्टर जारी


बैसरन खोऱ्यातील हल्ल्यानंतर, पहलगाम पोलिसांनी 22 एप्रिल रोजी दुपारी एफआयआर नोंदवला होता. त्यात कोणत्याही दहशतवाद्याचे नाव नव्हते. हल्ल्यामागे सीमेपलीकडे पाकिस्तानचा कट असल्याचे निश्चितपणे लिहिले होते. यानंतर, अनंतनाग पोलिसांनी 23 एप्रिल रोजी एक पोस्टर जारी केले. त्यात लिहिले होते की दहशतवादी हल्ल्याशी संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20  लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी ३ स्केचेस प्रसिद्ध केले. त्यात अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान आणि अली उर्फ ​​तल्हा भाई या तीन दहशतवाद्यांची नावे होती. या तिघांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे वेगळे बक्षीस जाहीर करण्यात आले. मुसा आणि अली हे पाकिस्तानी आहेत. मुसा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता.


स्केचसोबत एक फोटोही प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये 4 दहशतवादी घनदाट जंगलात रायफल घेऊन उभे आहेत. त्यात हाशिम मुसा आणि जुनैद अहमद भट्ट यांचाही समावेश होता. डिसेंबर 2024 मध्ये दाचीगामच्या जंगलात सुरक्षा दलांनी जुनैदला ठार मारले होते. हा फोटो त्याच्या मोबाईलवरून सापडला. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग येथील झेड मोर बोगद्यावर झालेल्या हल्ल्यात जुनैदचा सहभाग होता.


इतर महत्वाच्या बातम्या