सिंधुदुर्गात क्वॉरन्टाईन तरुणाला श्वास घेण्यास त्रास, उपचारांसाठी नेत असताना वाटेत मृत्यू
मुंबईतील मालाडमधून हा तरुण पत्नी आणि मुलीसह सिंधुदुर्गातील गावात गेला होता. तिथल्या शाळेत क्वॉरन्टाईन असताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारांसाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

सिंधुदुर्ग : क्वॉरन्टाईन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. हा तरुण मुंबईतील मालाडहून कालच (26 मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वॉरन्टाईन होता.
या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
संबंधित तरुण आपल्या पत्नी आणि मुलीसह मालाडहून खासगी गाडी घेऊन काल गुळदुवे गावात आला होता. गावात आल्यानंतर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन त्याला गुळदुवे इथल्या शाळेत क्वॉरन्टाईन करण्यात आलं होतं. परंतु रात्री अचानक या तरुणाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला उपचारांसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या तरुणाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्र आज खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलं आहे. तसंच या आरोग्य केंद्रात कोणाचीही प्रकारची तपासणी होणार नाही, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी माहिती दिली आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 असून त्यापैकी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दहा जणांवर उपचार सुरु आहेत.
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
महत्त्वाच्या बातम्या






















