Sindhudurg News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे गाव असलेल्या सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील वरवडे येथे आज वरवडे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होत आहे. या सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला एकही उमेदवार मिळाला नसल्यानं या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार नसतानाही निवडणूक होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. भाजप आणि राणे समर्थक अशा दोन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीसाठी उमेदवारचं मिळाला नाही. 


वरवडे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत भैरवनाथ सहकार पॅनेल विरुद्ध भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मात्र यात महाविकास आघाडीला उमेदवारही उभा करता आला नाही. या संस्थेचे 460 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे मतदार नेमक्या कुठल्या गटाला कौल देणार, ते पाहणं औसुक्त्याच आहे. संस्थेच्या वरवडे-फणसवाडी येथील कार्यालयात आज दुपारी साडेचारपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सोसायटीच्या 13 पैकी 12 जागांवर दुरंगी लढत होत आहे. तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी अर्ज न आल्‍यानं एक जागा रिक्‍त राहणार आहे.


कणकवलीतील वरवडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक आज सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी साडेचारपासून मतमोजणीला सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या गावातील ही सहकारी सोसायटीची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीसाठी उमेदवारचं मिळाला नाही. भाजप आणि राणे समर्थक अशा दोन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिंकून कुणीही येऊ दे, विजय मात्र राणेंचाच होणार त्याला कारणंही तसंच आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या गावांतील या निवडणुकीत कोणता पॅनल विजयी होणार आहे? हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकीत उमेदवाराचं मिळाला नसल्यानं शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कोकणात शिवसेनेचा देखील या निवडणुकीत उमेदवार मिळाला नाही. राणेंच्या बालेकिल्लात पर्यायाने राणेंच्या गावात विरोधकांना उमेदवाच मिळत नसल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात नाही. मात्र भाजप आणि राणे समर्थक अशी वरवडे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा