सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात (sindhudurg) भाजपला मोठा धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायत (kudal nagarpanchayat) महाविकास आघाडीच्या (mahaviskas aghadi) ताब्यात गेली आहे. त्यामुळे राणे समर्थकांना मोठा हादरा बसला आहे, नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजप (shivsena -Bjp) आमने-सामने येत या ठिकाणी राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. 4 पैकी 2 नगरपंचायत भाजपकडून महाविकास आघाडीने खेचून घेतल्या. प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड झालीय. दोडामार्ग नगरपंचायत मध्ये एकहाती भाजपचे वर्चस्व निर्माण झाले असून चेतन चव्हाण नगराध्यक्ष तर भाजपचेच देवीदास गवस विराजमान उपनगराध्यक्षपदी झालेत. देवगड नगरपंचायत मध्ये शिवसेनेच्या साक्षी प्रभू नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या  मिताली सावंत उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. वैभववाडी मध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी भाजपचेच संजय सावंत विराजमान झाले आहेत.


नारायण राणे यांना मोठा धक्का 


दरम्यान, कुडाळ नगरपंचायत मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. आमदार वैभव नाईक यांनी राणेंना शह देण्यासाठी २ नगरसेवक असलेल्या काँगेसला नगराध्यक्ष पद देऊन कुडाळ नगर पंचायत महाविकास आघाडीकडे आणली असल्याचे समजते. 


शिवसेना, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने


नगरपंचायत निवडणुकांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आलेल्या कोकण, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राजकीय संघर्ष अद्यापही सुरूच असल्याचं चित्र दिसत आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी कुडाळमध्ये पुन्हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. माहितीनुसार आमदार वैभव नाईक तसेच शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले असल्याची माहिती मिळत आहे. कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी कुडाळमध्ये पुन्हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सिंधुदुर्गात गाडी नगरपंचायत आवारात आणण्याच्या विषयावरून राडा झाला असून एकमेकांवर हात उचलण्याचा प्रयत्नही झाल.  पोलिसांनी नगरपंचायतला छावणीचे स्वरूप दिल्याचं समजत आहे. 


दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक


आज नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक कुडाळ नगरपंचायत येथील इमारतीच्या जवळ आले. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला.


अवघ्या एका जागेचा घोळ


कुडाळ नगरपंचायतीमध्येही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच अवघ्या एका जागेने घोळ घातला होता. कुडाळ नगरपंचायतमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस यांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली. त्यामुळे आता कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत होती. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालया समोरून वैभव नाईक यांची विजयी मिरवणूक जात असताना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. 


 


 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :