Sindhudurg District Bank Election : राज्य सरकारची लायकी फक्त पोस्टर्स लावण्यापुरती आहे, आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, 'लगान'ची टीम नको असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँक निवडणुकीत माझ्या विरोधात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आले. पण मी त्यांनी पुरुन उरलो. जिल्हा बँक निवडणुकीनंतर आता राज्याकडे लक्ष असून राज्यात भाजपची सत्ता आणणार. आम्हाला आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, 'लगान'ची टीम नको."

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून 11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

निवडणुकीत कोण विजयी कोण पराभूत

1) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका

सतीश सावंत (महाविकास आघाडी)-पराभूत

विठ्ठल देसाई (भाजप)-  विजयी

2) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका 

प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत 

विद्याप्रसाद बांदेकर (महाविकास आघाडी)- विजयी

सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत 

3) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका

गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत 

विद्याधर परब (महाविकास आघाडी)- विजयी

4) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुकाव्हिक्टर डान्टस (महाविकास आघाडी)- विजयी

कमलाकांत कुबल (भाजप)- पराभूत 

5) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुकामनीष दळवी (भाजप)- विजयी

विलास गावडे (महाविकास आघाडी)-पराभूत

6) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका

प्रकाश बोडस (भाजप)- विजयी

अविनाश माणगावकर (महाविकास आघाडी)

7) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका प्रकाश गवस (भाजप)- पराभूत गणपत देसाई (महाविकास आघाडी)- विजयी

8) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुकादिलीप रावराणे (भाजप)- विजयी

दिगंबर पाटील (महाविकास आघाडी)- पराभूत 

9) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ

राजन तेली (भाजप)- पराभूत 

सुशांत नाईक (महाविकास आघाडी)- विजयी

10) दोन महिला प्रतिनिधी

प्रज्ञा ढवण (भाजप)- विजयी

अनोरोजीन लोबो (महाविकास आघाडी) पराभूत 

11) दोन महिला प्रतिनिधी

अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत 

नीता राणे (महाविकास आघाडी)- विजयी

12) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आत्माराम ओटवणेकर (महाविकास आघाडी)- विजयी

सुरेश चौकेकर (भाजप)- पराभूत 

13) इतर मागास मतदारसंघात

रवींद्र मडगावकर (भाजप)- विजयी

मनिष पारकर (महाविकास आघाडी)- पराभूत 

14) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ

गुलाबराव चव्हाण (भाजप)- पराभूत 

मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी)- विजयी

15) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ अतुल काळसेकर (भाजप)- विजयी

सुरेश दळवी (महाविकास आघाडी)- पराभूत 

16) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ

गजानन गावडे (भाजप)- विजयी

लक्ष्मण आंगणे (महाविकास आघाडी)-

17) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघमहेश सारंग (भाजप)- विजयी

मधुसूदन गावडे (महाविकास आघाडी)- पराभूत 

18) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था

विनोद मर्गज (महाविकास आघाडी) पराभूत 

संदीप परब (भाजप)- विजयी

19) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघविकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत 

समीर सावंत (भाजप)-विजयी

संबंधित बातम्या :