Sindhudurg District Bank Election : राज्याचं लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. त्यावर ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली आहे.  ही सत्ता माझी नाही तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. सर्व कार्यकर्ते आणि नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत कामाला आली आहे असंही त्यांनी म्हटलं. 


भाजपचे नेते राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "दिल्लीपर्यंत सत्ता आमची आहे, त्यामुळे जिल्हा बँकेत पराभव झालेल्या राजन तेलींची वर्णी लावू असं आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे." 


सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचं नारायण राणे म्हणाले. राज्यात भाजपची सत्ता हवीय, 'लगान'ची टीम नको असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून 11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.


संबंधित बातमी :