एक्स्प्लोर
मालवणमध्ये 19 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
घरात कोणी नसल्याचं पाहून संजना पेंडुरकरने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

सिंधुदुर्ग : मालवणमध्ये 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुट्टीनिमित्त घरी आलेल्या सोनाली पेंडुरकरच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण शहरातील धुरीवाडा कन्या शाळेजवळ एका कॉम्प्लेक्समध्ये पेंडुरकर कुटुंब राहत होतं. संजय पेंडुरकर हे नेहमीप्रमाणे आपल्या सुवर्ण पेढीवर गेले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगी संजना घरातच होत्या. संजय यांच्या पत्नी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुकानावर गेल्या. दोन वाजताच्या सुमारास घरात कोणी नसल्याचं पाहून संजनाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. संजना ही रत्नागिरी येथील तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत होती. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती मालवणला घरी आली होती. संजनाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मालवण पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























