एक्स्प्लोर

ऊस दरावर अखेर तोडगा, एफआरपी एकरकमी मिळणार

कोल्हापूर: गेल्या आठवडयापासून सुरु असलेले ऊसाच्या दरासंदर्भातील चर्चेचे गुऱ्हाळ आज संपले आहे. कारण महसूलमंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांसोबतच्या आजच्या बैठकीत अखेर तोडगा निघाला. शेतकऱ्यांना यंदा एफआरपीची रक्कम एकरकमी देण्याची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय एफआरपीपेक्षा 175 रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनीही हा समझोता मान्य असल्याचं सांगितलं. मात्र पहिली उचल 3200 रुपये मिळावी, या मागणीवर आजही ठाम आहे, असं खासदार राजू शेट्टी म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसदराबाबत आज बैठकींचं सत्र पार पडलं. या बैठकीत वार्षिक ताळेबंदपूर्वी 70-30 फॉर्म्युल्यानुसार नफ्यातील रक्कम अॅडव्हान स्वरुपात देण्याचे कारखानदारांनी मान्य केले. तसेच एफआरपी व्यतिरिक्त 175 रुपये प्रतिटन देण्यास कारखाने तयार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर दिली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना  चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास सरकार योग्य ती परवानगी देईल. त्यामुळे 5 नोव्हेंबरपासून कारखाने सुरु करावेत. तसेच इतर जिल्ह्यातूनही 70-30 च्या फॉर्म्युल्यानुसारच प्रश्न सोडवावेत.'' तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी म्हणाले की,''ऊस उत्पादकांना अॅडव्हान्स मिळणार यावर समाधानी असलो, तरी ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळावी यावर आजही ठाम आहोत.'' तूर्तास चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीला यश आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात ऊसाला देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतील साखरेचा भाव यातील तफावतीवरुन बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्याने, सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने बैठक अर्ध्यावरच सोडली. बैठकीतील ठळक घडामोडी
  • वार्षिक ताळेबंद पूर्वी 70-30 फॉर्म्युल्यानुसार नफ्यातील रक्कम अॅडव्हान स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मान्य
  • एफआरपी व्यतिरिक्त 175 रुपयांचा प्रतिटन बोनस
  • एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास सरकार परवानगी देणार
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळण्यावर ठाम
  • 5 नोव्हेंबरपासून कारखाने सुरु करण्याचे चंद्रकांत आवाहन
  • बैठकीतील निर्णय एकतर्फी आल्याचा आरोप करत, सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने बैठक अर्ध्यावरच सोडली

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Pune Police News: पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Mumbai Rain Red Alert: मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Embed widget