नागपूर : नागपुरात 24 वर्षाच्या रेडिओ जॉकीचा ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला आहे.

शुभम केचे असं या आरजेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे लाईव्ह शोदरम्यान ब्रेकमध्येच शुभमचा मृत्यू झाला.

शुभम रेडिओ मिर्ची अर्थात 98.3 एफएम वाहिनीत काम करत होता. सकाळी 7 ते 11 दरम्यान त्याचा  'हाय नागपूर' हा शो असायचा. रोजच्या प्रमाणे आजही त्याचा हा शो सुरु होता. मात्र सकाळी 9.30 च्या सुमारास, ब्रेकमध्ये तो शौचालयात गेला. मात्र ब्रेक उलटून गेला तरी शुभम परतला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली.

सहकाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तरुण रेडिओ जॉकी शुभमच्या मृत्यूने नागपूरमध्ये शोकाचं वातावरण आहे.

संबंधित फोटो

RJ शुभमचा लाईव्ह शोदरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू