अक्कलकोट: 'अरेला कारेने उत्तर द्या.' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 'सत्ता आहे म्हणून मनमानी करु नका.' असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. ते अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात बोलत होते.
''वर्षा'वर गुंडांना सर्रास प्रवेश दिला जातो, हेच का पार्टी विथ डिफरन्स?" असा सवाल विचारत अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. दरम्यान काल देखील त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.
भाजप हा शेटजी- भटजींचा पक्ष: अजित पवार
“भाजप हा शेटजी- भटजींचा पक्ष आहे, असं मी लहानपणी ऐकायचो. मात्र ज्या बहुजन नेत्यांनी या पक्षाला चेहरा दिला, तीच मंडळी आता सत्ता आल्यावर अडगळीत पडली आहेत. मुंडे, डांगे, फरांदे अशा व्यक्तींनी भाजपला बहुजन चेहरा दिला. मात्र सत्ता आल्यानंतर ते अडगळीत पडले आणि सध्या सत्तेत गडकरी, जावडेकर, प्रभू आणि पियुष गोयल यासारखी मंडळी मिरवत आहेत. त्यामुळे भाजप केवळ बहुजन समाजाचा वापर करून घेत आहे."
मोदी आणि फडणवीस यांनी फुले, शाहू, आंबेडकरांची विचारसरणी खुंटीला टांगून ठेवल्याचा आरोप, अजित पवारांनी केला. अशी टीका त्यांनी काल सोलापूरमध्ये केली होती.
संबंधित बातम्या:
भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष : अजित पवार