उस्मानाबाद : भय्यू महाराजांचे समर्थक आपल्याला धमक्या देत आहेत आणि त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचं लेखी पत्र सकल मराठा मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलं आहे.
भय्यू महाराजांनी मोर्चाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सकल मराठा मोर्चातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर सातत्यानं भय्यू महाराजांचे समर्थक आपल्याला धमक्या देत असल्याचं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे.
इतकंच नाही तर काही जणांना सकल मराठा मोर्चाच्या लोकांना अब्रू नुकसानीच्या नोटीसाही धाडल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी भय्यू महाराजांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.