एक्स्प्लोर

Shrikant Shinde: ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवावी; श्रीकांत शिंदे यांचे आव्हान

एकीकडे नैतिकतेच्या गप्पा मारता दुसरीकडे न्यायालयाकडे पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा अशी मागणी करायची, नैतिकतेच्या नावावर धुळफेक करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

मुंबईः तुमच्या पाठिशी लोक असतील तर निवडणुकांना सामोरे जा, निवडून या आणि मग नैतिकतेच्या गप्पा मारा, असे आव्हान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिकतेच्या गप्पा ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. मात्र नैतिकता शिल्लक असेल तर ठाकरे गटात उरलेल्या शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामा द्यावा असं ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार श्रीकांत ठाकरे म्हणाले की, नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्यांनी 2019 मध्ये भाजप सोबत निवडणूक लढवली. एकत्रितपणे लोकांच्या समोर गेले, बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडणूक आले. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली. त्यासाठी दुसऱ्यासोबत संसार थाटला. नैतिकता असती तर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले नसते, असा घणाघात खासदार डॉ. शिंदे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची निवड वैध ठरवले आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता काही जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा हे मोठे झालेत आहेत, अशी खिल्लीही डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली. 

श्रीकांत शिंदे म्हणाले की, काही लोक बरळत सुटले आहेत. ते आता राज्यपाल्याचे पद बरखास्त करा, अशीही मागणी करू लागले आहेत. ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. निवडणुकीआधी केलेली युती नंतर तोडली ती नैतिकता होती का? ती जनतेसोबत गद्दारी आणि जनमताची प्रतारणा नव्हती का?

श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकीकडे नैतिकतेच्या गप्पा मारता दुसरीकडे न्यायालयाकडे पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा अशी मागणी करायची. नैतिकतेच्या नावावर नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. कोर्टाने मात्र यांना राजीनाम्याची आठवण करून देत यांची मागणी फेटाळली आहे. अपात्रतेबाबत सर्व निर्णय विधानसभा उपाध्यक्षांना घेण्याचा अधिकार देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यांची ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

यावेळी उदय सामंत यांनीही ठाकरे गटावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, कालपासून नैतिकतेचे धडे ज्यांना नैतिकता नाही ते देत आहेत. दुटप्पीपणा गेले काही महिने बघितले आहे. बारसूबाबत दुटप्पीपणा समोर आला. मुख्यमंत्री व्हायचं नाही अशा नैतिकतेच्या गप्पा मारायचा आणि पुन्हा पदावर बसवा असे सांगत आहेत. शिवसैनिक मुख्यमंत्री बनवणार म्हणाले आणि स्वतः झाले. त्यांच्या गटातील आमदार, खासदार आपल्यासोबत रहावेत यासाठी यासाठी खोटं बोललं जात आहे. संजय राऊत म्हणतात तीन महिन्यात पुन्हा न्यायालय निकाल देईल, असे खोटं पसरवत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget