एक्स्प्लोर

आता पक्ष आणि चिन्ह मिळणारच नाही, उद्धव ठाकरेंचं नेमकं कुठं कुठं चुकलं? श्रीहरी अणेंनी कायदेशीर बाबी सांगितल्या

Shrihari Aney : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबद्दल मोठा निकाल दिला. या निकालावर राजकीय प्रतिक्रिया तर अनेक आल्या. पण सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे त्या निकालाचं कायदेशीर विश्लेषण.

Shiv Sena MLA Disqualification Verdict Shrihari Aney : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबद्दल (Shiv Sena) मोठा निकाल दिला. या निकालावर राजकीय प्रतिक्रिया तर अनेक आल्या. पण सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे त्या निकालाचं (Shiv Sena MLA Disqualification Verdict ) कायदेशीर विश्लेषण. त्यासाठी आम्ही राज्याचे महाधिवक्ते आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. श्रीहरी (Shrihari Aney) अणे यांच्याशी सविस्तर बातचित केली. अध्यक्षांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या चौकटीतच होता, असं मत डॉ. अणे यांनी व्यक्त केलं. राजकीय पक्षांना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना तंतोतंत कायदा पाळण्याची सवय नसते, मात्र जेव्हा वाद होतो तेव्हा मग त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं महत्त्वाचं निरीक्षण देखील अणे यांनी नोंदवलं. तसंच, दोन्ही गटांना एकमेकांचे व्हिप पाळण्याची गरज नाही, त्यांनी आपापले व्हिप पाळावे असं मत देखील अणे यांनी व्यक्त केलं. 

अध्यक्षांचा निर्णय कोर्टानं घालून दिलेल्या चौकटीतच आहे, असे अणे यांनी सांगितलं. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांची नेमकी चूक कुठे झाली? याबाबतही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या घटनेत त्रुटी होत्या हे सिद्ध झालं. ठाकरेंनी पक्षाच्या घटनेकडे लक्ष दिलं नाही.  केलेले बदल योग्यरित्या निवडणूक आयोगाला कळवलेच नाहीत. नेत्याच्याही वर कायदा असतो हे अनेकांना कळत नाही. कायदेशीररित्या गोष्टी केल्या नाहीत तर परिणाम भोगावे लागतात, असे अणे यांनी सांगितलं. त्याशिवाय धनुष्यबाण आता उद्धव ठाकरेंना मिळणार नाही, असेही श्रीहरी  अणे यांनी सांगितलं.  

शिवसेना अपात्रेबाबत अध्यक्षांनी दिलेला निकाल हा त्यांना घालून दिलेल्या चौकटीतच आहे. याउलट जर त्यांना अधिक पुरावे तपासण्याचा अवधी मिळाला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता असं जेष्ठ कायदेतज्ञ आणि घटनेचे अभ्यासक श्रीहरी अणे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय. तसेच शेवटी कोणतंही कोर्ट अध्यक्ष कोण?, पक्ष कोणाचा?, नेता कोण? हे ठरवू शकत नाही. ते शेवटी जनताच मतपेटीतून ठरवेल असंही अणेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं तरी शेवटचा निकाल हा जनतेचाच असेल. मात्र पक्षाच्या घटनेची वैधता, व्हीप या बाबींच्या बाबतीत त्यांचा कायदेशीर लढा हा सुरूच राहील. तूर्तास शिवसेनेच्या दोन्ही गटांचे व्हीप हे वेगळे राहतील ते दोन्ही गटांकरता बंधनकारक होऊ शकणार नाहीत. आणि भविष्यात हात घटनाक्रम राष्ट्रवादी काँग्रेच्या बाबतीतही पाहायला मिळेल. कारण सध्याच्या काळातील लोकशाहीत घराणेशाहीला स्थान नाही, हे या उदाहरणांवरून सिद्ध होतंय. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या घटनांची योग्य पद्धतीन रचना करून ती अधिकृत करून घेणं आवश्यक असल्याचं अणेंनी आपल्या सांगितलं.

नेमका निकाल काय ?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी पार पडलं.  एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget