एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीहरी अणेंकडून वाढदिवसाला स्वतंत्र विदर्भाचं केक कटिंग
नागपूर : एकीकडे महाराष्ट्राच्या अखंडतेवरुन वादविवाद सुरु असताना नागपुरात मात्र वेगळ्याच केक कटिंगची चर्चा रंगली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा केक कापल्याचं समोर आलं आहे.
श्रीहरी अणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. केकवर अखंड महाराष्ट्र असून अणे यांनी सुरीने केक कापून विदर्भाचा तुकडा विलग केला.
स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विधानानंतर श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर यापुढे स्वतंत्र विदर्भासाठी लढत राहीन असा निर्धारही त्यांनी केला. विदर्भ आणि मराठवाड्यावर सातत्यानं अन्याय झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र करा अशी भूमिका श्रीहरी अणेंनी घेतली आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement