Shraddha Murder Case : दिल्लीतील बहुचर्चिच श्रद्धा हत्याकांडाचा तपास सुरू आहे, हा तपास जसजसा पुढे जात आहे, तशी धक्कादायक माहितीही समोर येत आहेत. श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) हिचे वडिल विकास वालकर (Vikas Walkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. 


...तर आज माझी मुलगी जिवंत असली असती - विकास वालकर


विकास वालकर म्हणाले (Shraddha Walkar Father Press Conference), श्रद्धा वालकरची हत्या झाली असून आम्हाला अत्यंत दु:ख आहे. यावेळी दिल्ली गव्हर्नर यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मला दिले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले. मात्र अगदी सुरूवातीस वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसे झाले नसते तर, आज माझी मुलगी जिवंत असली असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती असे विकास वालकर म्हणाले आहेत. 


न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, मी आज माझी मुलगी श्रद्धा वालकर हिच्या मृत्यूबद्दल मी बोलणार आहे. दिल्ली गव्हर्नर यांनी मला आश्वासन दिले आहे की मला न्याय मिळवून देणार आहे. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील मी भेट घेतली आहे. किरीट सोमय्या हे माझ्या घरी आले होते, तसेच त्यांनी निलम गोऱ्हे यांचेही आभार मानले आहेत. असे विकास वालकर म्हणाले.


"आफताब पूनावालाला कठोर शिक्षा व्हावी"
विकास वालकर म्हणाले, आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, सोबतच आफताबच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी, तसेच त्यांना सुद्धा शिक्षा द्यावी. या कटात जे कोणी सामील असतील त्याचा तपास करून त्यांना शिक्षा असावी.


"धर्मजागृती व्हायला हवी"
विकास वालकर म्हणाले, जे व्यक्ती स्वातंत्र्य 18 वर्षानंतर दिला जातं, त्यावर विचार करायला हवंय, त्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. मोबाईल अॅपवर सुद्धा मर्यादा हव्यात. यावर काऊन्सिलिंग व्हायला हवी, याबाबत धर्मजागृती व्हायला हवी. तुमच्या मुलांवर नियंत्रण ठेवले गेले पाहिजे, माझ्या मुलीने जेंव्हा धर्म सोडला, तेंव्हा तिला 18 वर्ष पूर्ण झाले असे ती म्हणाली होती. 


"श्रद्धाने तक्रार केली असताना ती का परत आली नाही?"


मला हेच शोधायचं आहे की, श्रद्धाने तक्रार केली असताना ती का परत आली नाही? 23 सप्टेंबर 2022 ला मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. मी तिच्या मित्राकडूनच श्रद्धाची माहिती घेत होतो. मला माहित नव्हतं की श्रद्धा सोबत या दरम्यान काय होत होतं. श्रद्धाने तुळींज पोलीसांना तक्रार केली हे मला माहीत नव्हतं. 2021 मध्ये माझं श्रद्धा सोबत शेवटचा बोलणं झालं होतं. तू कुठे आहेस? कुठे राहते हे मी तिला विचारले. त्यावेळी मी बंगलोर असल्याचा श्रद्धा बोलली. 26 सप्टेंबर 2021 ला माझं आफताबशी एकदाच बोलणं झालं, तेंव्हा माझी मुलगी कुठे आहे? कशी आहे हे विचारलं? त्यावर मला त्याने योग्य उत्तरं दिली नाही. तुलिंज पोलिसांनी मला तक्रार झाल्यावर कुठलीच माहिती दिली नाही. याची चौकशी व्हायला हवी. घर सोडताना माझा श्रद्धा सोबत फक्त बोलणं झालं, मी तिला सांगितलं की, हा मुलगा आपल्या समाजाचा नाही, त्यावेळी तिने सांगितलं की मी त्याच्यासोबत जाणार आहे आणि ती घर सोडून गेली 


"आम्हाला सरकारकडून वकील दिला जाणार"
विकास वालकर म्हणाले, श्रद्धाला ब्लॅकमेल केलं जातं असणार त्यामुळे तिच्यावर जे अत्याचार होत होते. त्यावर तिने आम्हाला काही सांगितलं नाही. माझा श्रद्धा आफताबच्या नात्याला विरोध होता. डेटिंग अँपमुळे आफताब माझ्या मुलीला भेटला होता. त्यातून ते रिलेशनशिप मध्ये आले, दरम्यान, न्यायालयात आम्हाला सरकारकडून वकील दिला जाणार आहे. त्यासोबत या केसमध्ये दिल्लीच्या वकील सीमा कुशवाह या देखील आमची बाजू न्यायालयात मांडतील