Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या (jalgaon zilla dudh sangh election) निमित्तानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच आता एकनाथ खडसे यांच्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) मैदानात उतरले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी थोरात यांनी एका मतदाराला फोन करुन खडसे आपलेच आहेत त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.


नेमकं काय घडलं? 


जळगाव दूध संघाची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगाव दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे एका विवाहाच्या निमित्तानं आज जळगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी एका मतदाराला आपल्याला सहकार्य करण्याबाबत खडसे यांनी बाळासाहेब थोरात यांना सांगितले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मोबाईलवर तया मतदाराशी संपर्क केला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी खडसे आपलेच आहेत त्यांना सहकार्य करावे अशी विनंती मतदाराला केल्याचं पाहायला मिळाले. 


10 डिसेंबरला मतदान 11 डिसेंबरला मतमोजणी


जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तसेच माघारीसह उमेदवारांना चिन्ह वाटप ही प्रक्रिया पार पडली आहे. त्या त्या पक्षांकडून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे तसेच प्रचाराला वेग आला असताना सहकार विभागाने आदेश काढून या निवडणूका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांमधून नाराजी सुद्धा व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य शासनाच्या सहकार विभागाने नव्याने आदेश काढले असून ठरल्या तारखेवर तसेच वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे या आदेशात म्हटले आहे. आता पूर्वीच्या आदेशानुसार 10 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीबाबत दोनच दिवसात पुन्हा नव्याने आदेश निघाल्याने चर्चेला उधाण आले असून आता पुन्हा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा चांगलाच धुराळा उडणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon: ठरलेल्या तारखेलाच होणार जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक; सहकार विभागाचे आदेश