एक्स्प्लोर
शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा
मुंबई: शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राज्यभर प्रसिद्धी मिळावी यासाठी सरकारनं शासकीय यंत्रणा कामाला लावली आहे.
24 डिसेंबरला मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे फ्लेक्स सरकारी कार्यालय, रेशन दुकान, शाळा आणि महत्वाच्या ठिकाणी लावावेत अशा सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. याकरिता येणाऱ्या खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असंही सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत हे फ्लेक्स 20 डिसेंबरपासून लागलेले असतील याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement