एक्स्प्लोर

शिवस्मारक दुर्घटनेवरून शिवसेना-भाजपात राजकारण सुरु

कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत ढिसाळ असल्याची टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या कार्यक्रमाची इतकी घाई करायला नको होती असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तर इतक्या लोकांचे प्राण संकटात टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, असं शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघातावरुन आता शिवसेना-भाजपात राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. पायाभरणी कार्यक्रमाच्या दरम्यान सरकार कुठं होतं? असा सवाल आता शिवसेनेच्या वतीनं विचारण्यात आला आहे. कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत ढिसाळ असल्याची टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या कार्यक्रमाची इतकी घाई करायला नको होती असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तर इतक्या लोकांचे प्राण संकटात टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, असं शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या शिवस्मारक पायाभरणीचा कार्यक्रमा दरम्यान सरकार नेमकं कुठे होतं ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. ज्यांनी नियोजन केलं त्यांनी अत्यंत ढिसाळ होतं. तिथे जाण्यासाठी जी बोट निवडली ती फायबर होती. त्यात 24 लोक होते, आणि केवळ 5-6 लाइफ जॅकेट होते. मग सुरक्षा व्यवस्था कुठे होती ? कशासाठी आपण हे करतोय? ह्यात सुद्धा राजकारण आहे का ? क्रेडिट साठी आपण हे करतोय का? असा सवाल सावंत यांनी केला आहे. वल्लभभाई पटेल यांचा पुतळा करणारेच हा शिवस्मारकाचा पुतळा करणार आहेत. त्याचं शेवटचं फिनिशिंगचं काम सुरु असताना येथे ते अजून इथं आलेले नसताना या कार्यक्रमाला इतकी घाई का केली, असेही सावंत यांनी म्हटलं आहे. सरकारने याची जिम्मेदारी घेऊन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला. सिद्धेश हा त्याचे सख्खे मामा आणि शिवसंग्रामचे कार्यकर्ते विक्रांत आंब्रे यांच्यासोबत शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेला होता. बोट अपघातात विक्रांत आंब्रेही जखमी झाले आहेत. सिद्धेश हा व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. तो गेलं वर्षभर सीएची प्रॅक्टिस करत होता. मुख्यमंत्र्यांकडून मयत सिद्धेश पवारच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातानंतर शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget