एक्स्प्लोर
रावसाहेब दानवेंना धक्का, होमग्राऊंडवर शिवसेनेने हरवलं !

जालना : रावसाहेब दानवेंच्या होमग्राऊंडवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांची निवड झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अनिरुद्ध खोतकर शिवसेना उमेदवार अनिरुद्ध खोतकर यांना 34, तर भाजप उमेदवार अवधूत खडके यांना 22 मते मिळाली. जालना जिल्हा परिषदेत 22 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने अध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर यांना बसवलं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्याच होमग्राऊंडवर शिवसेनेने बाजी मारल्याने शिवसैनिकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. जालना जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा - 56) : भाजप – 22 शिवसेना – 14 राष्टवादी – 13 काँग्रेस – 5 अपक्ष – 2
अनिरुद्ध खोतकर शिवसेना उमेदवार अनिरुद्ध खोतकर यांना 34, तर भाजप उमेदवार अवधूत खडके यांना 22 मते मिळाली. जालना जिल्हा परिषदेत 22 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने अध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर यांना बसवलं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्याच होमग्राऊंडवर शिवसेनेने बाजी मारल्याने शिवसैनिकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. जालना जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा - 56) : भाजप – 22 शिवसेना – 14 राष्टवादी – 13 काँग्रेस – 5 अपक्ष – 2 Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















