एक्स्प्लोर

नारायण राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार- सूत्र

नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत घेतलं तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत घेतलं तर शिवसेना बाहेर पडणार, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे एनडीएत दाखल होतील आणि त्यांना राज्यात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी पक्ष स्थापनेची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिक काळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली. शिवाय शिवसेनेच्या नेत्यांशीही राणेंचं फारसं पटत नाही. त्यामुळे राणेंकडे मंत्रिमंद असताना शिवसेना मंत्री आणि राणे मांडीला मांडी लावून बसणार का, हा सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत – दानवे नारायण राणे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांना तासाभरातच एनडीएत सहभागी होण्यासाठी आमंत्रण आल्याची माहिती आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राणेंनी त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं अजून जाहीर केलेली नाहीत. मात्र ते एनडीएत आले तर त्यांचं स्वागत करु, असं दानवेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. राणेंना कोणतं खातं देणार? भाजप मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आपल्याकडचं महत्त्वाचं खातं काढून राणेंना देऊ नये, यावरुन भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. त्यामुळे महत्त्वाचं खातं काढून घेऊ नये, यासाठी भाजप मंत्र्यांची धडपड सुरु आहे. राणेंना मंत्रिमंडळात घ्यावं, मात्र इतरांना धक्का लावू नये, अशी भाजप मंत्र्यांची भावना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नारायण राणेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या ही खाती चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे यापैकी एक खातं राणेंना दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्याकडील एक खातं जाण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ राणेंचा नवा पक्ष काँग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान असं राणेंच्या नव्या पक्षाचं नाव आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. लवकरच या पक्षाची नोंदणी करणार असल्याचं राणेंनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. तसंच राणेंच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु होत्या. भाजपाध्यक्ष अमित शाहांची भेटही राणेंनी दिल्लीत जाऊन घेतली होती. संबंधित बातम्या :

‘महाराष्ट्र स्वाभिमान’ नारायण राणेंचा नवा पक्ष

पक्ष स्थापनेच्या तासाभरात राणेंना एनडीएत येण्याचं आमंत्रण : सूत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचं षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
गडचिरोली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचं षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Pune Unseasonal Rain: पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
Virar Crime News: संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा
संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget