एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे भाजपात!
मुंबई : हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण कळमनुरीचे माजी आमदार आणि शिवसेना नेते गजानन घुगे यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.
मुंबईत 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटन मंत्री रवींद्र भुसारी, राज्यमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला.
मराठवाड्यात शिवसेनेची चांगली ताकद असणारा जिल्हा म्हणून हिंगोलीकडे पाहिलं जातं. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेने भाजपला मागे टाकलं होतं. मात्र आता शिवसेनेच्या नेत्यांनीच भाजपचा रस्ता धरल्याने मराठवाड्यात शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement