एक्स्प्लोर
अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' नको, विधानसभेत शिवसेना आक्रमक
अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची आहे.

A
मुंबई : अंगणवाडी सेविकांना लावलेला 'मेस्मा' कायदा त्वरित रद्द करावा, या मागणीवरुन विधानसभेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. मेस्मा कायदा रद्द करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला. विधानसभेत आक्रमक झालेले शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला. या प्रकरणावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला झाला. अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची आहे. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे : पंकजा मुंडे
दुसरीकडे, जोपर्यंत मेस्मा हटवत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज होऊ न देण्याची भूमिका शिवसेनेने विधानपरिषदेत घेतली. ज्या अंगणवाडी सेविकेमुळे कुपोषण कमी झालं, तिला का आंदोलन करावं लागतं, मेस्मा जबरदस्ती आहे, असं विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले. काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला.Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















