एक्स्प्लोर

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

मुंबई : विविध आरोपांच्या चक्रव्युहात सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याभोवतीच्या अडचणीत आता आणखी वाढ होत आहे. कारण मित्रपक्ष आणि सत्तेतील सहकारी शिवसेनेनेही एकनाथ खडसेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.   खडसेंनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावं, निर्दोषत्व सिद्ध करुन सन्मानाने मंत्रिमंडळात यावं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   खडसे यांच्याविरोधात लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणासह इतर गंभीर आरोप आहेत. अशावेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. थोड्याच वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.   दरम्यान, शिवसेनेच्या मागणीनंतर एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मला काहीही बोलायचं नाही, पक्षाचे अध्यक्ष बोलतील, असं खडसे म्हणाले.   दरम्यान, राजीनाम्यासाठी दबाव असल्यानं खडसेंनी मुंबईतून काढता पाय घेतला आहे. मुक्ताई अंतर्धान सोहळ्याच्या निमित्तानं खडसे गेल्या तीन दिवसांपासून मुक्ताईनगरात आहेत. विशेष म्हणजे या काळात त्यांनी सरकारी गाडीचा वापर करणंही टाळलं आहे.   खडसेंवरील आरोप *कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक *जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप *दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा * भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद   भोसरी जमीन खरेदीप्रकरण भोवणार?   भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी खडसे सध्या रडारवर आहेत. कारण  भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले.  परंतु ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.  

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

  दुसरीकडे भोसरीची जागा MIDC ची नाही असा दावा करणाऱ्या एकनाथ खडसे यांचा दावा खुद राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खोडून काढला.   ही जागा MIDC ची असून 1962 मध्ये या जागेचं वाटप उद्योगांसाठी करण्यात आल्याचं देसाई म्हणाले.   शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनी हे स्पष्ट केल्यामुळे जमीन प्रकरणात एकनाथ खडसे तोंडघशी पडले आहेत. एकूणच खडसेंच्या अडचणीत भर टाकून, शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युती तोडणाऱ्या खडसेंचा हिशेब चुकता केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.   लाल दिवा सोडून खडसे जळगावात एकनाथ खडसेंनीदोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही  हजेरी लावली नाही. शिवाय जळगावमध्ये खडसेंनी लालदिव्याची गाडीही वापरली नाही. त्यामुळे खडसेंचं मंत्रिपद जाणार की त्यांचं फक्त महसूलमंत्रिपद काढून घेतलं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.  

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे

खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget