संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा भाजपसोबत सत्तेच्या वाटपाबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. संपूर्ण राज्यासमोर, माध्यमांसमोर आम्ही दोन्ही पक्षांनी सत्तेच्या समसमान वाटपाबाबतचा फॉर्म्युला मान्य केला आहे. जर समोरचा पक्ष त्या फॉर्म्युलाचे पालन करत नसेल तर आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत. भाजपने ठरलेल्या फॉर्म्युलाचे पालन करुन, सत्तास्थापन करावी.
संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल (31 ऑक्टोबर) एक गुप्त बैठक झाली होती. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊतांना विचारले असता, राऊत म्हणाले की, शरद पवारांना भेटण्यात गैर काय आहे? मला त्यात काहीही गैर वाटत नाही.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचालींना वेग : सूत्र
राऊत म्हणाले की, शरद पवारांना मी नेहमीच भेटत असतो. आमच्यात राजकीय गप्पा होतात, त्यावरुन माझ्यावर टीकादेखील होते. मी अनेक दिवस पवारांना भेटलो नव्हतो. काल वेळ काढून भेटलो. त्यांना भेटल्यानंतर मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. ते अनेक विषयांवर मार्गदर्शन करतात. कृषीविषयक प्रश्नांचे निरसन करतात.
व्हिडीओ पाहा
...म्हणून भाजप शिवसेनेची बैठक रद्द झाली
संजय राऊत आणि शरद पवारांची गुप्त बैठक | ABP Majha