एक्स्प्लोर

पालघर नगरपरिषदेत भाजप-शिवसेना युतीचा तिढा सुटला

पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटल्याचं चित्र आहे.

पालघर : पालघर  नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटल्याचं चित्र आहे. आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे पालघरमध्ये नगराध्यक्षपद शिवसेनेचा होणार असून शिवसेना 19 आणि भाजप 9  जागा अशा पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांचे समाधान करण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. काही निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली आहे. दुसरीकडे भाजपकडे लढण्यासाठी पुरेसे उमेदवारच नसल्याने त्यांच्या जागा आपोआप कमी झाल्या आहेत. दरम्यान पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावरही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. तसेच आमदार पास्कल धनारे व शिवसेना-भाजपा पदाधिकारी यांनीही आचारसंहितेचा भंग केला आहे. पालघर अग्निशमन केंद्रात नगरपरिषद निवडणूक कार्यालय आहे. या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच्या सर्व प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस असल्याने नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार या ठिकाणी दाखल होत होते. उमेदवार व सूचक यांनाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची परवानगी असताना एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि खासदार राजेंद्र गावित यांनी शिवनेसा-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह थेट आत शिरुन आचारसंहितेचा भंग केला. पोलिसांनी या सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी थेट प्रवेश केल्यामुळे मंत्र्यांसमोर या पोलिसांनीही बघ्याची भूमिका स्वीकारली. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना
समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
MPSC Protest Pune: सॅल्यूट, टाळ्या आणि घोषणा...; MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल
MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Embed widget