एक्स्प्लोर
परिचारकांबाबत विरोधकांसह शिवसेनेचा दुतोंडीपणा उघड
प्रशांत परिचारक यांनी गेल्यावर्षी जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांचं दीड वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र अचानक गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला.
मुंबई : सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबाबत शिवसेना आणि विरोधकांचा दुतोंडीपणा उघड झाला आहे. कारण निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेणाऱ्या समितीमध्ये शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे आणि विरोधकांमधील आमदारही आहेत.
परिचारक यांचा निर्णय मान्य नसेल, तर लिखित असहमती दर्शवणं अपेक्षित असते. मात्र असं काहीही नीलम गोऱ्हे किंवा कपिल पाटील यांनी केले नाही.
समितीत कोण कोण होतं?
- रामराजे निंबाळकर (विधानपरिषदेचे सभापती)
- चंद्रकांत पाटील (भाजप)
- सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- जयंत पाटील (शेकाप)
- नारायण राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
- नीलम गोऱ्हे (शिवेसना)
- कपिल पाटील (शिक्षक आमदार)
- भाई गिरकर (भाजप)
- शरद रणपिसे (काँग्रेस)
संबंधित बातमी : आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement