एक्स्प्लोर

राज्याचा मुख्यमंत्री कोण? आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

लोकसभेच्या विजयानंतर शिवसेनेचीच नव्हे तर भाजपचे खासदार देखील भेटायला आले होते. हा एकोपा असला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता ही माती होऊन द्यायची नाही, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या चर्चेवर आज खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विरोधकांना लगावला. युती करण्याची भावना महत्वाची आहे. देशात अनेक राज्यात युती आणि आघाडी झाली. मात्र आज त्यांची अवस्था काय आहे हे समोर आहे, असे ते म्हणाले. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात, मात्र आपण आता एकसाथ दौडायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या विजयानंतर शिवसेनेचेच नव्हे तर भाजपचे खासदार देखील भेटायला आले होते. हा एकोपा असला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता ही माती होऊन द्यायची नाही, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि खासदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की,  संघर्षाच्या वेळेला मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही कारण त्यांनी मला असे सवंगडी दिले आहेत. मात्र अशा आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण येते. त्या सर्व शिवसैनिकांची आठवण येते ज्यांनी शिवसेना मोठी केली. ते म्हणाले की, शिवसैनिक प्रेम केलं तर भरभरून प्रेम करतो आणि लढायचं म्हटलं तर जीवाची बाजी लावून लढतो. ठाकरे यावेळी म्हणाले की, युती करण्याची भावना महत्वाची आहे. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात. मात्र आता आपण आता एकसाथ दौडू, आपण संघर्ष केल्याने विरोधकांचं फावलं असल्याचं ठाकरे म्हणाले. यावेळी अनेक नेत्यांच्या भाजप प्रवेशावर ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे अशी काय शक्ती आहे काही माहिती नाही. आम्ही विरोधी पक्षात उतरणार होतो तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते होते तर ते देखील भाजपमध्ये आले. आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपत घेऊ नका असे अजित पवारांनी सांगितलं आहे, असे ठाकरे म्हणाले. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. याचा मला आनंद आहे. आपण जिंकलो याचा सर्वाधिक आनंद आहे. मला दुसऱ्यांच्या पराभवानंतर आनंद साजरा करायला आवडत नाही. मात्र सावरकरांना डरफोक म्हणणाऱ्यांना हरवलं यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले. ओवेसी म्हणतो आम्ही या देशात भाडेकरू नाही. आम्ही समान भागीदार आहोत, तर वन्दे मातरम् म्हणायला लाज का वाटते. एवढं स्वातंत्र्य देऊनही तुमच्या मनातले किडे का वळवळतात?, असा सवाल ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावलं तर तुमच्या पोटात का दुखतंय, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.  याआधीही ही परंपरा होती. भाजपचा अधिवेशनात शिवसेना प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मध्यंतरी परंपरा खंडित झाली होती. मात्र  मधल्या काळातला दुरावा आता पूर्ण नाहीसा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget