एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवप्रताप दिनाचा उत्साह, प्रतापगडावर विविध कार्यक्रम
या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
सातारा : छत्रपती शिवाजी राजेंच्या शौर्याच्या गाथा सांगणारा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन... या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
एकीकडे गडावरच्या कार्यक्रमाची लगबग सुरु असताना दुसरीकडे मात्र आज सकाळी संपूर्ण प्रतापगड हा धुक्यात हरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. या गडासोबत या भागातील संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगाही धुक्यात हरवल्या होत्या.
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातलं, तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगापैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध आहे. त्यानिमित्तच प्रतापगड उत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा केला जातो.
या गडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीमुळे प्रतापगडाकडे आणि या उत्सवाकडे सर्वांचं लक्षअसतं. हिंदुत्ववादी संघटनानी उपस्थित केलेल्या वादानंतर हा उत्सव आता सरकारच्या वतीने साजरा केला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement