एक्स्प्लोर

शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर

पवारांनी एकदा-दोनदा नव्हे तर चार वेळेस पक्ष सोडला. त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडली. दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला. अशा पवारांना आता पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवाल शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

लातूर : शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. निलंगा येथे एबीपी माझाशी बोलताना निलंगेकर म्हणाले की, शरद पवारांमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे नुकसान झाले. आता त्यांचे तसेच होत आहे.  पवार फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले. स्वतः पवारांनी एकदा-दोनदा नव्हे तर चार वेळेस पक्ष सोडला. त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडली. दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला. अशा पवारांना आता पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवाल शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण आहेत? असाही सवाल निलंगेकरांनी शरद पवारांना केला. पवार हे राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पवारांनी आपल्या राजकीय वाटचालीत अनेकांना धोबीपछाड दिली. कित्येक सहकाऱ्यांचे पराभव घडवून आणले. विलासराव देशमुखांना शरद पवारांनी पराभूत केलं. पण आता पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य कमी झाल्यानं भाजपच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीतून सर्वाधिक भरती होत आहे, असे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे. आपलं मुख्यमंत्रीपद घालवण्यातही शरद पवारांचाच हात आहे, असेही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी मुलींचे गुण वाढवल्याचा आरोप शिवाजीराव पाटील निलंगेकरांवर झाला होता. याच आरोपानंतर शिवाजीराव पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं.  पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत   शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले. मात्र आज त्यांचा राष्ट्रवादी पक्ष त्याच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवारांना पाहण्याचं भाग्य देखील लाभलं, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सांगलीत टीका केली आहे. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं बोललं जातं, त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल. त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतंय ते फार वेगळं घडतंय असं नाही असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं

व्हिडीओ

Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Embed widget