एक्स्प्लोर

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूक; निकालाची उत्सुकता शिगेला

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र, प्रचारातील उत्साह मतदानात दिसून आला नाही. सरासरीच्या 40 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र, प्रचारातील उत्साह मतदानात दिसून आला नाही. सरासरीच्या 40 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या बुधवारी सकाळी 8 वाजता विद्यापीठातील परीक्षा भवन येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. 100 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे.

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी विरुद्ध शिव-शाहू आघाडीअंतर्गत शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Senate Election 2022) शिक्षक संघ (सुटा), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नोंदणीकृत पदवीधर गटात 36 हजार 343 मतदारांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत मतदान होईल, असा अंदाज होता. मात्र, गेल्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मतदारांचा निरुत्साह जाणवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी काम पाहिले.

नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदान नोंदणीसाठी जोरदार मोहीम राबवण्यात आली होती.  असे असूनही त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. 25 हजारांवर मतदार गेले कोठे असाच प्रश्‍न मतदानानंतर उपस्थित झाला. या मतदारांचे करायचे काय, अशी भावना कार्यकर्त्यांत दिसून आली. (Shivaji University Senate Election 2022)

शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील 33 मतदान केंद्रांवर मतदान झाले. अधिसभा शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, अभ्यास मंडळासाठी मतदान झाले. यंदा पदवीधरसाठी तीनपट जास्त नोंदणी होऊनही केवळ 30 टक्केच मतदान झाले. पदवीधरसाठी 36 हजार 343, तर शिक्षकसाठी 640 मतदार होते. अधिसभा (39), विद्यापरिषद (8), तर नऊ अभ्यास मंडळांच्या 27 जागांसाठी निवडणूक होत आहे. शिक्षक गट, विद्यापरिषद आणि अधिकार मंडळावरील वर्चस्वासाठी विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात थेट लढत आहे. 

कोल्हापूर शहरातील सायबर कॉलेज, कॉमर्स कॉलेज व श्री शहाजी कॉलेज या केंद्रांवर सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली. विद्यापीठ विकास आघाडी आणि शिव-शाहू आघाडीचे केंद्रांबाहेर बूथ लावण्यात आले होते. त्याठिकाणी मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या कक्षात आहे, याची माहिती समर्थक देत होते. उमेदवार मतदान केंद्राबाहेर थांबून मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते.

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget